Ganpati Bappa Moraya - Ganpati Special Article



गणपती बाप्पा मोरया - गणपती विशेष लेख 



गणपती बाप्पा मोरया!

मस्कार वाचकहो,

काय मग बघता बघता बाप्पा यावर्षीही आलेत. तयारी झाली असेलच नाही का?
गणपती बाप्पा च्या आगमनाने आपल्या सर्वांची मने आनंदाने भरून वाहत आहे. लहान मुलांना तर गणपती बाप्पा खूपच आवडतात. बाप्पांच्या आगमनाने घरात एक वेगळीच ऊर्जा उत्पन्न होते.

बाप्पाची नावं

बाप्पांची खालीलप्रमाणे १०८ नावं आहेत. पहा बरे तुमच्या महितीतला नाव दिसताहेत का ?
आखुरथ, अलम्पटा, अमित, अनंताचिद्रूपमायाम, अवनीश, अविघ्ना, बालगणपति, भालचंद्र, भीमा, भूपति, भुवनपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिया, बुद्धिविधता, चतुर्भुज, देवदेव, देवतकनाशकारिन, देवव्रता, डेवेन्द्रशिका, धार्मिक, धूम्रवर्ण, दर्जा, द्वैमातुर, एकाक्षरा, एकदंता, एकदृष्टा, ईशानपुत्र, गदाधर, गजकर्ण, गजानन, गजननेति, गजवक्र, गजवक्त्र, गणाधाक्ष्य, गणाध्यक्षीणा, गणपति, गौरिसुत, गुनिना, हरिद्रा, हेरम्बा, कपिला, कवीशा, कृति, कृष्णपिंगाक्ष, क्षमाकरम, क्षिप्रा, लम्बकर्ण, लम्बोदर, महाबल, महागणपति, महेश्वरम, मंगलमूर्ति, मनोमय, मृत्युएंजाय, मूँदकरामा, मुक्तिदाय, मुसिकवाहणा, नादप्रतीतीशता, नमस्तेतु, नंदना, नीदीश्वरम, ओमकारा, पीताम्बरा, प्रमोदा, प्रथमेश्वरा, पुरुष, रक्त, रुद्रप्रिया, सर्वदेवात्मन, सर्वदेवात्मन, सर्वात्मन, शांभवी, शशिवरणम, शूर्पकर्ण, शुभं, शुभगुणाकानां, श्वेता, सिद्धिदाता, सिद्धिप्रिया, सिद्धिविनायक, स्कन्दपुर्वजा, सुमुख, सुरेश्वरम, स्वरुप, तरुण, उद्दंड, उमापुत्र, वक्रतुंड, वरागणपति, वरप्रदा, वरदविनायक, वीरगणपति, विद्यावारिधि, विघ्नहारा, विग्नहर्ता, विघ्नराजा, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशय, विग्नेश्वरा, विकट, विनायका, विश्वमुखा, विश्वराजा, यग्नकाया, यशस्कारम, यशवासिन आणि योगाधिपा 

बाप्पांची मूर्ती:


बाप्पांची मूर्ती ही इकोफ्रैंडली असावी अस प्रत्येकाचे मत असले तरी काहीजण अजुन ही प्लास्टर ऑफ़ पेरिस च्या मुर्त्या बनवत विकत घेत आहेत. ज्या भक्तांनी शालू मातीच्या गणपतीची स्थापना केली त्यांचे मी मन:पूर्वक अभिवादन करतो. माझी त्यांना हीच विनंती आहे की शालू मातीचा गणपति विकत घ्यावा आणि पर्यवरणाच्या सुरक्षेचा त्यांनी थोड़ा विचार करावा. मूर्ती विसर्जनानंतर समुद्र किनारी किती मूर्त्यांचे अंग इथे तिथे पडलेले असतात बघून मन रडू लागते. दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पाच्या क्रिएटिव अश्या मुर्त्या पहायला मिळतात. कलर पेंसिल च्या रंगबिरंगी टोकांची मूर्ति, कलरफुल बटन्स ची मूर्ति, मोत्यांची मूर्ति अश्या अनेक मुर्त्या हे मूर्तिकार बनवत आहेत. सावंतवाड़ी येथील माळिचे घर हे प्रसिद्ध घर आहे जिथे २०० कुटुंबांचा एक गणपती आहे. आणि ती गणपतीची मूर्ति तिथेच घडवली जाते.

बाप्पांचा मूर्तिकार


आज गणपती बाप्पांच्या मुर्तीच्या स्थापना घरो घरी झाल्या आहेत. गणपती बाप्पांच्या विविध प्रकारच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची पण वाढली आहे. बाप्पांची मूर्ति घडवणाऱ्याला आपण सगळ्यांनी एका कलाकारच्या दृष्टिकोणातून पाहणे खुप गरजेचे आहे. मधल्या काळात ज्या काही समाज कंटकांनी हिन्दू मुसलमानां मधे जे काही मतभेद निर्माण केले त्यांना या सना-सुदी मधे काढु नए. लोकमान्य टिळकांनी जे आम्हा सर्वाना जे काही शिकवले आहे ते कधीच विसरु नए. मूर्ति कोणीही बनवो मग तो कोणत्याही जाती धर्मातला असो लक्षात ठेवा के तो एक कलाकार आहे आणि त्यांच्याकडून मूर्ति घेतना संकोच करू नका.

बाप्पांचा मकर:

अगदी फार अगोदरची गोष्ट सांगितली तर की अगोदर गणपति बाप्पा यांचे मंडप हे घरच्या भिंतीला चिकटून असायचे. म्हणजेच भिंतीवर एखादे सुंदर अस चित्र काढून मग त्याच्या भोवताली गणपतीचे सजावतीचे सामान लावायचे. हल्ली तसा कही होत नस्ले तरीही ही पीढ़ी पण काही कमी नाही बुवा असे म्हणायला हरकत नाही. अलिकडे थरमोकलचे मकरांवर बंदी आल्यावर आता बाप्पांच्या भक्तांनी पेपर, फुट्टा, तोरण कपड्यांच्या मदतीने घरी मकर बनवायचे सुरु केले आहे. गणपति मण्डल यांनी तर दर वर्ष प्रमाणे एखाद्या बिग बॉस च्या कंटेस्टेंट प्रमाणे आपला गणपति किती मोठा अणि भव्य दिसेल यासाठी दिवस रात्र मेहनत घेतलेली दिसते. अरे भावांनो गणपति मोठा असेल किवा छोटा असेल तर तो गणपतीच ना. त्यापेक्षा त्यापैकी काही पैसे वाचवून तुम्हाला गोरगरीबाना एक वेळ छे जरी जेवण देता अला तर स्वर्ग नहीं का ? माझ्या ह्या प्रकारने बोलणेयाने जर कुणाच्या भावना दुखवाले गेले असतील तर क्षमा असावी.



बाप्पांचा प्रसाद मोदक :

आपल्या सर्वाना हे माहीत असेलच की बाप्पांचा आवडता प्रसाद हा मोदक आहे.
बाप्पांचा आवडता प्रसाद मोदक हा जगप्रसिद्ध आहेपण घरी बनवलेल्या उकडीच्या मोदकांची तर वेगळीच चव आहेतळलेले मोदक , चॉकलेटचा मोदकरव्याचे मोदकमावा मोदकखोबर्याचे मोदकड्रैफ्रूइट मोदकमलाई मोदकटिळाचे मोदककेसरी मोदकमैंगो मोदकपिस्ता मोदक अश्या विविध प्रकारच्या मोदकांची रेसिपी यूट्यूब वर उपलब्ध आहेतपण तुम्हाला हे महित आहे का की बप्पांना पांच पदार्थांचा नैवेद्य ही दाखवावा लागतो.  तुम्ही तुमच्या आवडीचा मस्त असा गोड शिरा पैन करू शकताखोबर्यांचे वडी पैन एक चांगले ऑप्शन असू शकतेखुप खा अणि बाप्पां सारखे गुड़गुड़ीत व्हा अशी अपेक्षा.


बाप्पांची गाणी

बाप्पांची सुप्रसिद्ध गाणी जशी चिक मोत्याची माळ, सनयीचा सुर जसा वाऱ्याने भरला, गजानना श्री गणराया, व इतर अश्या गाणी तुम्हाला पाठ असतीलच. पण गावातल्या भजनाचे सोहळे तुम्ही पहिलेत का? कोकणात गणपतीच्या आरती नंतर काळ्या वाटण्याची उसल दिली जाते. हल्ली ज्या कोणाला गणपतीची आरती सगळी पाठ असते त्याला आरती मधे खुप डिमांड असते नाही का?  गणपतिच्या दिवसात भालतीच गाणी लावून वेडी वाकडे नृत्य करणारे गणपति बाप्पांचे खरे विनोद वीर असतात. हलक्या अवाज़ात शांत अशी भक्ति गीते स्पीकर वर ऐकण्यात कोणाला ही अड़चन होत नसते. तुम्हाला आवडेल त्या गण्यांचे एल्बम आज यूट्यूब वर उपलब्ध आहेत. अजारी माणसांना त्याचा त्या स्पीकरच्या अवाजाचे त्रास होऊ नए फक्त एवढीच काळजी असावी

बाप्पांची रांगोळी: 

रांगोळी यांचे नाते किती घट्ट आहे हे तुम्हाला महित असेलच. विविध प्रकारच्या लहान मोठ्या रांगोळ्या गणपती समोर काढली जाते. वसईच्या ज्यूचंद्र मधे तर पुरुष रांगोळी काढण्यात तरबेज झाले आहेत. समाजाला संदेष देणाऱ्या रांगोळ्या, फुलांच्या रांगोळ्या आणि इतर प्रकारच्या रांगोळ्यां मुळे लोकांच्या कलेला वाव मिळतो. कोकणात तर गणपती बाप्पा असलेल्या प्रत्येक घरात तुम्हाला हमखास एक रांगोळी बघायला मिळेल.

बाप्पांचे भक्त:

बाप्पांचे भक्त हे विभिन्न प्रकारचे जरी असले तरी देवला आपण सगळे सारखेच आहोत हे आपल्याला माहीत असणे जास्त आवश्यक असते. लोकांनी गणपती ला नवास बोलणे बरोबर पण घरच्या गणपती कड़े बोलता एखाद्या मोठ्या गणपती कड़े बोलण्याने तो खरा होईल अशी खात्री बाळगणे पण अजबच आहे. गणपति मंडळानी पण हे लक्ष ठेवले पाहिजे की त्यांच्या गणपतीच्या दर्शनला आलेली लोक ही त्यांचे नाही बाप्पाचे भक्त आहेत. तेव्हा दर्शनला आलेल्या भक्तांवर त्यांनी अरेरावी करू नए. लक्षात ठेवा देव सगळे काही पाहत आहे. आणि एक महत्वपूर्ण प्रार्थना आहे त्या लोकांसाठी जे दारू पिउन मिरवणुकीत डांस च्या नावा खाली धिंगाना घालतात तो कृपया त्यांनी तो बंद करावा. आपल्या बाप्पा च्या मिरवणुकीत आलेल्या भक्तांची काळजी घेणे हीच खरी माणुसकीआणि जेथे माणुसकी तिथे देव हे विसरु नए.

बाप्पांची पाठवणी (अनंत चतुर्दशी):

गणपती बाप्पा लोकांच्या घरी दीड दिवसांसाठी, पांच दिवसांसाठी, सात दिवसांसाठी आणि ११ दिवसांसाठी येतात. अनंत चतुर्थीला म्हणजेच ११ व्या दिवशी आपल्या घरात, आपल्या मंडपात जे बाप्पा पाहुणे बनून आलेत ते निघणार या विचारणेच रडू येते. हे गजानना तुम्ही जरी गेलात तरी तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असावेत हीच तुमच्या चरणी प्रार्थना.
गणपतीच्या मिरवणुकीत या गोष्टींची काळजी घ्या

गणपतीच्या मिरवणुकीच्या गर्दीत आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा .

1. फटाक्यांचा वपर कमी करावा.
2. मिरवणुकीच्या गर्दित उगीच कोणत्या अफ़वेचा बळी ठरू नए. प्रथम स्वतः खात्री करावी. चेंगरचंगरी मधे जीवित हानि होऊ शकते.
3. विसर्जनाच्या वेळी समुद्रात किंवा तळ्यात त्यांनीच उतरावे ज्यांना नीत पोहता येते. उगाच जीव धोक्यात घालु नए.
4. मिरवणुकीत गुलाल उधळा पण कोणाच्या डोळ्यात किंवा कानात तो जात तर नाही न ह्याची काळजी घ्यावी




Comments

Popular posts from this blog

बारावी नंतर विद्यार्थी करू शकतील असे 10 सर्वोत्तम कॅरियर्स

Health Precautions to be taken during Monsoon Season

Why Eduvogue is World’s Best Institute for Learning Digital Marketing